RTE Lottery Result 2026: सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) सोमवारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक सँ प्रशिक्षण परिषद, (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात आली. ही सोडत संगणकीय प्रणालीद्वारे पी पारदर्शक पद्धतीने पार पडली असून पात्र विद्यार्थ्यांची निवड याद्वारे करण्यात आली. पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली असली तरी, पालकांना आरटीई प्रवेश प्रक्रियेत आपल्या पाल्याची निवड ख information देण्यात आली आहे.
More information दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये शिक्षणाची ी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते. यंदाही ही आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरण्यास १७ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली होती. अर्ज भरण्यासाठी पालकांना ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती.
त्यानुसार, १ लाख १४ हजार ८२६ जागांसाठी राज्यभरातून २ लाख ८९ हजार २८९ पालकांनी आपल्या पाल्याचे आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले असून, या सर्व अर्जांमधून संगणकीय पद्धतीने पारदर्शक लाॅटरी काढण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्याँ शुक्रवार,१० एप्रिल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. More information संंदेशाद्वारे (एसएमएस) कळविले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून दिली जात आहे.
What’s wrong with you?
आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळेत निश्चित कालावधीत कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित जागा पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया १० एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत राबविली जाणार आहे, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा…
- जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
पालकांना आवाहन…
पालकांना शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही अफवा, गैरसमज किंवा मध्यस्थांवर विश्वास न ठेवति अधिकृत संकेतस्थळ व शासकीय माध्यमांवरूनच माहिती घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे. आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक More information तालुका गटव कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
