अक्षरची अष्टपैलू चमक; भारताचा विजयारंभ; पहिल्या सामन्यात ६गडी राखून वर्चस्व आज दुसरी लढत & more related news here

अक्षरची अष्टपैलू चमक; भारताचा विजयारंभ; पहिल्या सामन्यात ६गडी राखून वर्चस्व आज दुसरी लढत

 & more related news here


बर्मिंगहॅम : कर्णधार शुभमन गिलची ८० धावांची दिमाखदार खेळी आणि अक्षर पटेलने (नाबाद ५७ धावा आणि ४ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ६ गडी व २८ चेंडू राखून पराभव केला. याबरोबरच भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना गुरुवारी कार्डिफ येथे खेळवण्यात येईल.

यूके दौऱ्यातील भारताचा हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध भारताने ०-२ अशी टी-२० मालिका गमावली, तर इंग्लंडविरुद्धही त्यांच्या पदरी ०-४ अशी निराशा पडली. टी-२० मालिकेतील सुमार कामगिरीमुळे टीका सहन करणाऱ्या अक्षरने ६२ धावांत ४ विकेट्स घेत आणि नंतर नाबाद ५७ धावा विजयात मोलाचे योगदान दिले. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर क इंग्लंडचे २५९ धावांचे आव्हान ४५.२ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *