News on unseasonal rains in Maharashtra: राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. More information असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वादळी वारा कडकडाटासह पाऊस सुरु आहे. यामध्ये सोलापूर, पंढरपूर, परभणी, इंदापूर या भागात वादळी पाऊस सुरु आहे. तर काही भागात वीज पडल्याच्या घटना देश घडल्या आहेत.
इंदापूर तालुक्यात काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात
इंदापूर तालुक्यात काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. इंदापूर तालुक्याच्या कांदलगाी शहा हिंगणगाव यासह उजनी पट्ट्यात रात्री पावणे नऊ वाजल्यापासून हा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळत असल्याने यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जात आहे.
पंढरपुरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
पंढरपुरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरासह आसपासच्या ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसात आहे. याच काळात पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याची देक घटना घडली. यामध्ये झाड जळाले गेले मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामा शेतकऱ्यांमध्ये द्राक्ष, डाळिंबा सारख्या फळबागांच्या पिकांना चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खर्डी येथे एका पाठोपाठ एक अशा चार विजा कोसळल्या
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे एकाच दिवशी चार ठिकाणी वीज पडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे. बनकर माळी वस्ती येथे उसात वीज पडून उसाने पेट घेतला. More information पेटला. जळकेवाडी येथील नारळाच्या झाडावर एक ठिकणी तर बाळू जगताप यांच्या आंब्याच्या ज पडून झाड पूर्ण जळून खाक झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. पण एका पाठोपाठ चार वीज व काल एक अशा पाच विजा पडल्याने खर्डी ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
परभणी जिल्ह्यात विजांच्य्कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी
परभणी जिल्ह्यात दिवसभर प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, संध्याकाळच्या सुमारास अचानक More information वाऱ्याने आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून आ दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांत अशाच प्रकारच्या पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे करण्यात आले आहे.
सोलापूरच्या अक्कलकोट मध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ आदी गावांना पावसाने झोडपले आहे. अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेल्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील अर्जुन गाडेकर या शेतकऱ्याच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने गहू, ज्वारी, कांदा पिके भिजून गेले. याशिवाय अनेक भागत काढलेले पीक भिजली आहेत.
आणखी वाचा
